एक मॅसेज, एक क्लिक आणि अभिनेत्रीला लाखोंचा गंडा!

मुंबईमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीसह ४० जणांना लाखोचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मोबाईल फोनवर एक मॅसेज आला, त्या लिंकवर क्लिक केले आणि पैसे काढल्याचा मॅसेज आला असल्याचे अभिनेत्रीने म्हटले. अशाप्रकारे ४० जणांना भामट्यांनी लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.;

Update: 2023-03-06 15:24 GMT

अलिकडच्या काळात ऑनलाईन फसवणूकीच्या (Online Fraud) गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या ऑनलाईन फसवणूकीवर 'जमताडा' सारखी एक वेबसिरिज सुद्धा काढण्यात आली होत्या. या वेबसिरिजच्या माध्यमातून समाजात कशाप्रकारे ऑनलाईन गंडा घातला जातो हे सांगण्यात आले होते. मात्र आजही अशा प्रकरची फसवणूक होते असल्याचे समोर आले आहे. मुंबईत एका अभिनेत्रीसह ४० जणांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरुन हे स्पष्ट होते की, आरोपींची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. संबंधितांच्या मोबाईलवर एक मेजेस पाठवला जातो. त्या मॅसेजमध्ये आक लिंक दिली जाते. या लिंकवर क्लिक करुन पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्यास सांगितले जाते. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक फोन येतो. त्यावर आलेला ओटीपी सांगण्यास सांगितले जाते आणि ओटीपी सांगताच आपल्या अकाउंटमधून लाखो रुपये डेबिट झालेले पाहायला मिळते, अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले आहे.

याप्रकरणी अभिनेत्रीने जी तक्रार दाखल केली आहे, त्यामध्ये तिने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या बॅकेशी जो मोबाईल नंतर कनेक्ट आहे, त्या मोबाईल नंबरवर तुमचे बँक अकाउंट ब्लॉक झाल्याचा मॅसेज पाठवला जातो. आणि त्या मॅसेजसोबत एक लिंक पाठवली जाते. या आलेल्या लिंकवर क्लिक करताच संबंधितांच्या खात्यामधील रक्कम वजा झालेली दिसून येते. श्वेता मेनन सोबत अशा प्रकारची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तीने याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. श्वेता मेनन (Shweta Menon) हिला अशाच प्रकारचा मॅसेज आणि लिंक मोबाईलवर आली होती. त्या लिंकवर क्लिक करुन त्यावर पॅनकार्ड नंबर, नेट बॅकिंग आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तिच्या अकाउंटवरुन ५७ हजार ६०० रुपयांची रक्कम काढून घेण्यात आल्याचे तिने सांगितले.

समोरच्या व्यक्तीने मेनन यांच्याकडून ओटीपी आणि पासवर्ड मागून घेतले होते. या व्यक्तीने आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगितले होते. या व्यक्तीने फोनवरच ओटीपी टाकायला सांगितले. आणि त्याने मेनन यांना बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढून घेतले. अशाप्रकारे दोनवेळा मेनन यांच्या बँक अकाउंटमधून पैसे काढण्यात आले. असे एकूण ४० जणांच्या अकाउंटमधून पैसे काढून घेतल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. हा फसवणूकीचा आकडा लाखो रुपयांचा देखील असू शकतो. असे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे फसवणूक झालेले तक्रादार हे एकाच बँकेचे खातेदार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सायबर पोलिसांनी (Cyber ​​Crime)नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही बँक आपल्या ग्राहकांकडून ओटीपी किंवा खात्याची माहिती मागू शकत नाही. तसे त्यांना अधिकार बँकेने दिलेले नाहीत. त्यामुळे असे मॅसेज आले तर ते उघडण्याचा प्रयत्न करु नये. किंवा बँकेतून बोलतोय तुमचा ओटीपी किंवा बँक पासवर्ड द्या, तर ग्राहकांनी खातरजमा केल्याशिवाय काहीही करु नये. आणि अशाप्रकारच्या ऑनलाईन फसवणूकीला बळी पडून नये. 

Tags:    

Similar News