अभिनेत्री आश्विनी महांगडे हीने शेअर केली मनोज जरांगे पाटलांवर पोस्ट
अभिनेत्री आश्विनी महांगडे हिने मनोज जरांगे पाटलांवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात जरांगे पाटलांचा एक फोटो शेअर करत तिने मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षमय प्रवासाचं वर्णन करत त्यांच्या व्यक्तीमत्वाचं कौतूक केलं आहे. त्यांच्या या मराठा आंदोलनाला जाहीर पाठींबा दर्शवला आहे.;
News
मराठा समाजाला सरसगट ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवाली सराटीपासून ते मुंबईपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला असून आंदोलन आता मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झालं आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज मोठ्या प्रमाणात आलेला आहे. हे आंदोलन गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वेगवेगळे सेलिब्रिटी आपलं मत मांडताना दिसत आहेत. अशातच नुकतीच 'आई कुठे काय करते' फेम आश्विनी महांगडे हिने आपल्या सोशल मिडीयाच्या वालवरुन मनोज जरांगेंबद्दल एक पोस्ट केली आहे ज्यामधून तिने थेट मराठा आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
अश्विनी महांगडेने हीने मनोज जरांगे पाटील यांचं एक छायाचित्र शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही लिहिलं आहे. अश्विनी महांगडेने पोस्टमध्ये लिहिलंय की, "सहज फिरायला जावून घरी परतलो तरी २ ते ३ दिवस "फार दमलो" म्हणत काढतो आपण. पण हा अवलिया माणूस.. एक भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं. आलेल्या हजारो संकटांना या माणसाने याच्या सहज आणि स्पष्ट बोलण्याने, खरेपणाने परतवून लावले. आज लाखो मुलांच्या डोळ्यात एक स्वप्नं आहे की आता तरी न्याय मिळेल." अशा पध्दतीची पोस्ट शेअर तिने मराठा आरक्षणाला जाहीर पाठींबा दिला आहे.