खटारा वर कारवाई सुरू

देशभरात रस्त्यांच्या कडेला अनेक बेवारस गाड्या दिसतात. या गाड्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या खटारा गाड्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.;

Update: 2022-03-19 04:53 GMT

मुंबई शहरात रस्त्याच्या कडेला अनेक बेवारस वाहने आढळतात. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी शहरात पडलेल्या खटारा गाड्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

शहरात बेवारस पडलेल्या खटारा गाड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या गाड्या रस्त्यावरून हटवण्याची मागणी केली जात होती. मात्र आता मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करून शहरातील खटारा गाड्यांवर कारवाई सुरू असल्याचे म्हटले आहे.

पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, शहरात मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिस यांच्यावतीने शहरातील बेवारस पडलेल्या वाहनांवर कारवाई करत सफाईचे काम सुरू आहे. तर हे काम खूप कठीण आहे, परंतू तुमच्या पाठींब्याने आम्ही ते साध्य करू, असा विश्वास दिला आहे. तर सोबत काही छायाचित्रे जोडत असल्याचे म्हटले आहे.



 

Tags:    

Similar News