राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त होताना दिसत आहे. पुण्यात तब्बल 91 गावं ही कोरोनाची हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. त्यातच मुंबईत देखील कोटोन रुग्ण वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आता अॅक्शन मोड मध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आल्यानं मुंबई पोलीस गर्दीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करताना दिसत आहेत.
मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या आदेशानुसार पोलीस रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत ,सोबतच नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन देखील पोलिसांकडून केले जात आहे.
गुरुवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा हजारांहून अधिक नागरिकांकडून दंड वसूल केला आहे. दिंडोशी ते दहिसरपर्यंत असलेल्या भागात पोलिसांनी तब्बल 719 लोकांकडून दंड वसूल केल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर फिरताना नागरिकांनी मास्क वापरावा असं आवाहन पोलिसांनी केली आहे.