गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या आरोपीला राहुरीतून ताब्यात घेतले आहे.;

Update: 2021-08-21 07:37 GMT

 अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या आरोपीला राहुरीतून ताब्यात घेतले आहे. प्रेम पांडुरंग चव्हाण असं या आरोपीचे नाव असून तो श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राहुरी कारखाना परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली, या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी कारखाना परिसरात असलेल्या हॉटेल साक्षी येथे सापळा रचला. दरम्यान आरोपी प्रेम चव्हाण हा गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने सदर हॉटेल समोर आला आणि परिसराची टेहाळणी करू करू लागला. त्याच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी खात्री पटताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रेम वर झडप घेतली.

त्यानंतर त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिंवत काडतुस असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

ही कारवाई अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमनाथ दिवटे,गणेश इंगळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक शंकर चौधरी,रवी सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल घुंगासे, सागर ससाणे,रोहित येमुल,चालक हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांनी केली आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

Tags:    

Similar News