पत्रकार हर्षल भदाणे यांचे अपघाती निधन

Update: 2024-07-30 05:39 GMT

नवी मुंबईतील युवा पत्रकार आणि टाइम्स नाऊ डिजिटलचे प्रतिनिधी हर्षल भदाणे यांचे काल धुळे येथे अपघाती निधन झाले आहे . हर्षल यांनी झी २४ तास, टीव्ही ९, जय महाराष्ट्र, साम या चॅनलवर काम केले होते. हर्षल भदाने यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. हर्षल यांच्या अपघाती निधनाने पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे.

धुळे जिल्ह्यातील धुळे औरंगाबाद महामार्गावरील गरताड गावाजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

एका भरधाव ट्रकने धुळे औरंगाबाद रोडवरील गरताड जवळ त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की हर्षल यांचा मृत्यू झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर

या ट्रकने शहरातील मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ चार वाहनांना ट्रकची धडक दिली. घटनेनंतर ट्रक सोडून चालक फरार झाला आहे.

हर्षल भदाने यांच्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः धुळे पोलीस अधीक्षकांची फोनवर बोलणं केलं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर हर्षल भदाणे अपघात प्रकरणी दोन जणांना धुळे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून हर्षल च्या कुटुंबीयांना योग्य न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही गृहमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणातील कारवाई अधिक वेगवान व्हावी आणि हर्षल भदाणे यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत मिळावी या मागणीसाठी उद्या दुपारी टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशनची कार्यकारणी मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे.

Tags:    

Similar News