राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, कोणतीही जिवीत हानी नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे सध्या तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते हिंगोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नर्सी नामदेव येथे जात असताना यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांचा अपघात झाला आहे.;

Update: 2021-08-06 10:50 GMT

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे सध्या तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत. गुरूवारी त्यांनी नांदेडचा दौरा केला होता. शुक्रवारी ते हिंगोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या मंदिरास भेट देण्यास जात होते. मात्र या प्रवासात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांचा अपघात झाला आहे.

ही घटना शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास हिंगोलीतील नर्सी नामदेव येथे घडली आहे. राज्यपालांच्या वाहनांच्या ताफ्यातील सर्वात मागे असणारी फायर ब्रिगेडची गाडी व इतर दोन गाड्या एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. या तीनही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून यात कोणालाही इजा झाली नाही.

Tags:    

Similar News