औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तहसीलदार चंद्रकांत शेळके सह एका खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पैठण तालुक्यातील सलग दुसऱ्यांदा तहसीलदारवर एसीबीची कारवाई करण्यात आली आहे.
यातील तक्रारदार यांचा शेती व वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांचे भागीदारीत असणाऱ्या शेतात अतिवृष्टी मुळे नदीतील वाळूचा साठा झाला आहे. त्यामुळे वाळूचा उपसा करणे व दोन हायवा द्वारे वाळू वाहतूक करण्याकरिता खाजगी इसम नारायण वाघ यांनी पंच साक्षीदार समक्ष रुपये 1 लाख 30 हजार ची मासिक हप्ता स्वरूपात मागणी केली. त्यानंतर तहसीलदार यांच्या चेंबर मध्ये यावर पंचासमोर चर्चा झाली. त्यानंतर पैठण पोलोसांत गुन्ह दाखल करण्यात आला आहे.