राज्यात एका दिवसात 5 हजार 640 कोरोनाबाधीत रुग्ण
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची कमी झालेली संख्या आता पुन्हा वाढते आहे.;
गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झालेले असताना शुक्रवारी मात्र कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. ५,६४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 5 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे राज्यात ६ हजार ९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्याने आता १ कोटी कोरोना चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १६ लाख ४२ हजार ९१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८९ टक्के एवढे झाले आहे.
सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ०९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ४ हजार ८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ७८ हजार २७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सध्या ७८ हजार २७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.