राज्यात 24 तासातील नवीन रुग्णसंख्या घटली, पण 567 रुग्णांचा मृत्यू

Update: 2021-05-03 16:43 GMT
राज्यात 24 तासातील नवीन रुग्णसंख्या घटली, पण 567 रुग्णांचा मृत्यू
  • whatsapp icon

कोरोनामुळे भयावह परिस्थिती असताना थोडी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील नवीन रुग्णसंख्येत घट झाली आङे. सोमवारी राज्यात ४८,६२१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर ५६७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्राचा मृत्यूदर १.४९% एवढा आहे. तर दुसरीकडे आज ५९ हजारे ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ४०,४१,१५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.७% एवढे झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७८,६४,४२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७,७१,०२२ (१७.१२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,०८,४९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,५९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,५६,८७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान मुंबईतही रुग्णसंख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत केवळ 2 हजार 36 रुग्ण आढळले आहेत. तर 71 रुग्णांचा मृत्तयू झाला आहे. तर 5 हजार 746 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. मुंबई सध्या 54 हजार 143 एक्टिव्ह रुग्ण आहेत. पण सध्या चाचण्यांची संख्याही घटली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 23 हजार 542 चाचण्या झाल्या आहेत.

Tags:    

Similar News