देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे ४६ हजार ९५१ रुग्ण आढळले आहेत. तर २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तर २१ हजार १८० रुग्ण कोरोनामधून बरे झालेले आहेत. त्यामुळे देशातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ३ लाख ३४ बजार ६४६ एवढी झाली आहे. तर १ कोटी ११ लाख ५१ हजार ४६८ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान गेल्या २४ तासात झालेल्या रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील नवीन रुग्णांचे प्रमाणा ७७. ७ टक्के आहे. तर १७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाच्या एकाही रुग्णचा मृत्यू झाल्याची नोंद नाहीये.
दरम्यान देशात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण चार कोटी ५० लाख नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लसीकरणाबद्दल कुणीही शंका घेण्याची गरज नाही. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी तातडीने लस घ्यावी असे आवाहनही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.