राज्यात कोरोनाचे संकट आणखी गंभीर झाले आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे तब्बल २५ हजार ८३३ रुग्ण आढळे आहेत. गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर १२ हजार १७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.७९ % एवढे झाले आहे. गेल्या ४८ तासात राज्यात कोरोनाचे जवळपास ४९ हजार रुग्ण आढळले आहेत. तर ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२२ % एवढा आहे. राज्यात सध्या १ लाख ६६ हजार ३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील सर्वाधिक रुग्ण नोंद गेल्या २४ तासात नागपुरात झाली आहे, इथे तब्बल २ हजार ९२६ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत २४ तासात २ हजार ८७७ रुग्ण आढळले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नाशिकमध्ये १ हजार ६७५ रुग्ण आढळले आहेत. एकाच एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात २ हजार ७९१ रुग्ण आढळले आहेत आणि २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.