40 लाखासाठी मित्राच्या मुलाचे केले अपहरण; 4 आरोपी जेरबंद

Update: 2021-09-12 01:15 GMT

पैशांसाठी एका नऊ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना अंबरनाथच्या ग्रीन सिटी पार्क येथून समोर आली होती. तांत्रिक आधारे ठाणे क्राईम ब्रांचने एडिशन सीपी अशोक मोराले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आरोपींचा शोध लावत लहान मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सूटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अंबरनाथच्या ग्रीन सिटी पार्कमध्ये राहणाऱ्या सोनू सरिता यांचा वडापावचा मोठा व्यवसाय आहे. त्यांचा 9 वर्षाचा मुलगा कृष्णा हा 8 सप्टेंबरच्या सायंकाळी घरातून ट्युशनसाठी निघाला. मात्र तो पुन्हा घरी परतला नाही. घरच्या लोकांनी त्याची शोधाशोध सुरु केली. तो कुठेही आढळून आला नाही. या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. दरम्यान कृष्णाचे चुलते सत्येंद्र यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने कृष्णाचे अपहरण केले असल्याचे सांगून मुलगा परत हवा असल्यास 40 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितले. याची माहिती मिळताच ठाणे क्राईम ब्रांच, कल्याण क्राईम ब्रांच, उल्हासनगर क्राईम ब्रांच आणि अंबरनाथ पोलिस मुलाच्या शोधासाठी पथके तयार करुन तपास सुरु केला. क्राईम ब्रांचचे डिसीपी लक्ष्मकांत पाटील, उल्हासनगरचे डीसीपी प्रशांत मोहिते आणि सर्व पोलीस या मुलाचा शोध घेत होते.अपहरणकर्त्यांनी पुन्हा एकदा फोन केला. या फोन नंतर पोलिसांनी तपासाचे सूत्र हलविले. तेंव्हा काही सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा आरोपींच्या सोबत जात असल्याचे दिसून आले. मुलाच्या वडिलांनी देखील आरोपींची ओळख पटवून सांगितली. तांत्रिक बाबींच्या आधारे कल्याण नजीकच्या मोहने परिसरात छापा टाकत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. लहान मुलगा कृष्णा यांची आरोपींच्या तावडीतून सूटका केली. पोलिसांनी आरोपी छोटू सिंग, अमजद खान, योगेश सिंग अन्य एकाला अटक केली आहे. हे सर्व आरोपी मुलाच्या वडिलांच्या ओळखीचे होते. कृष्णा देखील त्यांना ओळखत होता. तीन दिवस आरोपींनी मुलाला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. आरोपी हे मुलासोबत फ्रेंण्डली होते. त्याला त्रास देत नव्हते. त्यामुळे मुलावर जास्त ताण आला नाही. मुलगा ट्युशन गेला असता तुझे आई वडिल आजारी आहे. तू एकटाच घरी राहू शकत नाही असे बोलून मुलाला एका आरोपीने आपल्या घरी घेऊन गेले होता मुलाचे अपहरण करण्यात आले होते.

पोलिसांमुळे मुलगा त्याच्या कुटुंबियांना परत मिळाल्याने त्याच्या पालकांनी सूटकेचा निश्वास सोडला आहे. मुलाच्या वडिलांनी पोलिसांचे मनापासून अभिनंदन करत आभार मानले.

Tags:    

Similar News