मुंबईतील जुहू भागामध्ये एका महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलेने आत्महत्येसाठी विष पिण्या अगोदर स्वत:चा व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये तिने जुहू येथील वरिष्ठ पीआय शशिकांत माने, भाजपचे आमदार अमित साटम आणि संजय कदम, बिल्डर किरण हेमानी यांचे नाव घेतले आहे. सचिन सावंत यांनी या महिलेचा विष घेतानाचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. तसेच मुंबई पोलीस आणि राज्य सरकारने याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.
या महिलेवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. "आज मी आत्महत्या करते आहे. पोलिसांनी मला खूप त्रास दिला आहे. माझ्या मुलांचाही विचार न करता त्यांच्यावर खोटी केस केली. मी विष पिऊन आत्महत्या करते आहे. माझ्या मृत्यूला संजय कदम, अमित साटम जबाबदार आहेत. संध्याकाळपासून मी बसले होते. मला न्याय हवा आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा" असे या महिलेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी चौकशीला सुरूवात केली आहे. पण FIR दाखल करुन घेण्यात आलेली नाही, अशी माहिती पीडित महिलेच्या पतीने दिली आहे.
ThisThis needs your urgent attention @MumbaiPolice @CPMumbaiPolice
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 25, 2021
This is very very serious. Hope the lady is fine. @OfficeofUT @Dwalsepatil @satejp https://t.co/xrRHYXZHEC