वीज कनेक्शन कट केलेल्या महिलेचा संताप, कर्मचाऱ्यांना मारहाण
वीज बिल वसुली विरोधात आता राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत;
सध्या महावितरण तर्फे राज्यभरात वीज बिल वसुली सुरू आहे ज्या ग्राहकांनी आपले वीज बिल भरलेले नाहीत त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम केले जात आहे पण आता या मोहिमेवरून राज्यभरात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. असाच प्रकार रायगड जिल्ह्यात देखील घडलेला आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातील वावोशी येथील वितरण कार्यालयातील दोन कर्मचा-यांना संतप्त महिलेने मारहाण केली आहे. वावोशी - गोरठण येथील व्यावसयिक महिला सुशीला काकडे यांनी दुकान व घराच्या वीज बिला सदंर्भात वावोशी विजवितरण कार्यालयात जाऊन विज तोडणी बद्दल जाब विचारला. यानंतर त्यांनी दोन कर्मचा-यांना कार्यालयातच बेदम चोप दिला.
सदर कर्मचा-यांनी मारहाणी सदंर्भात खालापुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. यानंतर मारहाण करणा-या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.