गेले काही महिने आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे समाजजीवन ढवळून निघाले आहे. इथे पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने नांदणारा समाज एकमेकांकडे संशयाने बघू लागला आहे. आपापल्या जातींभोवती पुन्हा भिंती बांधणे सुरू झाले आहे. निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे हे वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. समाजात एकीकडे अशी कमालीची अस्वस्थ स्थिती असताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालख्यांनी लाखो मनांना आश्वस्त करीत पंढरीच्या वाटेने प्रस्थान ठेवले आहे या संदर्भात सविस्तर डॉ श्रीरंग गायकवाड,संत साहित्यिक अभ्यासक काय म्हणतात नक्की ऐका...