कोरोना संकटात समाजसेवेचा आदर्श, पंगतीऐवजी लग्नात रक्तदान

Update: 2021-04-17 04:45 GMT

जळगाव – कोरोना संकटाच्या काळात अनेक गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, पण त्यातच अनेकजण आपापल्या परिने समाजसेवा करण्याचे कामही करत आहेत. असाच एक आदर्श आता जळगाव जिल्ह्यात नवविवाहित दाम्पत्याने निर्माण केला आहे. नवोदित दाम्पत्य चेतन आणि स्वाती यांचा विवाह जामनेर तालुक्यातील लोणी इथे पार पडला. कोरोना संकटात सर्व नियम पाळून हा विवान आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर या विवाह सोहळा प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वरमाळा टाकण्याअगोदर नवोदित दाम्पत्याने रक्तदान करत नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रासह जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती भयंकर होत चालली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्ग ला रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोना काळात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होत असल्याने आपल्या लग्नात या नवदाम्पत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सुमित पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदात्यांमध्ये लोणी गावातील तरुण,माणुसकी ग्रुपचे सदस्य यांनी सहभाग नोंदवला. यावेळी एकूण २१ दात्यांनी रक्तदान केले.

Tags:    

Similar News