# Ganesh Chaturthi : मुस्लिम तरुणाच्या घरी बाप्पांचे आगमन

Update: 2021-09-10 10:23 GMT

एकीकडे देशात असहिष्णुता वाढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्ये होत आहेत. एकीकडे असे वातावरण असताना भारताची सर्व धर्म समभाव जपणारा देश म्हणून असलेली प्रतिमा जपण्याचा प्रयत्नही अनेक जण करत असतात, असाच प्रयत्न एका मुस्लिम तरुणाने केला आहे. येवला तालुक्यातील पुरणगाव येथील रहीम शेख या मुस्लिम तरुणाने आपल्या घरात गणरायाची स्थापना केली आहे.



गणपती बाप्पांवर आपली श्रद्धा आहे, त्यामुळे आपण दरवर्षी गणेशाची स्थापना करुन बाप्पांची सेवा करत असतो, असे या तरुणाने सांगितले आहे. राज्यातही अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करत असतात.

Tags:    

Similar News