आदर्श लोकप्रतिनिधीच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज सोलापुरातील सांगोल्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थ तसेच त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.;

Update: 2021-07-31 06:26 GMT

सांगोला // गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज सोलापुरातील सांगोल्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. गणपतराव देखमुख यांचे पार्थिव त्यांच्या पेनूर या जन्मगावी ठेवण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थ तसेच त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. सांगोल्यात देशमुख यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यातील विविध पक्षाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम

एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला. गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होतो. यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1962 साली ते पहिल्यांदा निवडून आहे होतो. त्यानंतर त्यांनी 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला.2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे गणपतराव देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.

बहुतांश काळ विरोधी बाकांवर राहिलेला आमदार

गणपतराव देशमुख हे अधिक काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला त्यावेळी देखील गणपतराव देशमुखांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. मात्र, एवढ्या उच्च पदावर बसून देखील त्यांच्यात अतिशय साधेपणा होता.

मागील आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुखांवर उपचार सुरु होते. पण काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Tags:    

Similar News