अनधिकृत स्टॉल्समुळे परवानाधारक असूनही आपला व्यवसाय होत नाही, अशी तक्रार एका अपंग स्टॉलधारकाने पनवेल महापालिकेकडे केली आहे. पण महापालिकेने या अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई न केल्याचा आरोप करत या अपंग व्यक्तीने महापालिकेबाहेरच उपोषण सुरू केले आहे, आपल्या सर्व कुटुंबासह त्यांनी उपोषण सुरू केले आहे. महापालिकेने ज्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा दिली तिथेच काही अनधिकृत स्टॉल्स आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने महापालिका आयुक्तांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी भेट देण्यास नकार दिला. दरम्यान आपल्या मागणीची दखल घेतली न गेल्यास आत्मदहन करु असा इशारा या अपंग आंदोलकाने दिला आहे. याच उपोषण स्थळी जाऊन आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी घेतलेला हा आढावा...