सरकार किती मुजोरपणे वागू शकतं याची झलक आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांनी दिलीय. यावेळी जाधव यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केलीय.
दरम्यान यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, "सभागृहात आज विशेष कामकाज नव्हतं.. सरकार किती मुजोरपणे वागू शकतं याची आज झलक होती. त्यामुळे विरोधी पक्षांना सभागृहात आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळेल, अशी आशा होती. परंतु पहिल्याच दिवशी बाळासाहेब थोरात हे विराधी पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सरकारने त्यांची दखल घेतलीच नाही. तसेच सरकार नम्रपणे आणि लोकशाही पद्धतीने विरोधकांचं म्हणण ऐकूण घेईल अशी शक्यताही नसल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं.