ब्रेकअपनंतरही त्रास देत असल्याच्या रागातून तरुणीनं तरुणाला जिवंत जाळलं

Update: 2022-02-12 07:30 GMT

एकीकडे संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डेच्या तयारीला सुरूवात झाली असताना नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ब्रेकअप झाल्यानंतरही प्रियकर प्रेयसीला त्रास असल्याच्या रागातून प्रेयसीनेच प्रियकराला जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या तरुणाला मारहाण करत जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात घडली आहे. ब्रेकअपनंतर प्रियकर प्रेयसीच्या लग्नाला अडथळे आणत असल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. या घटनेत तो युवक 55 टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात राहणारा या ३१ वर्षांच्या युवकाला मारहाण करत जिवंत जाळण्यात आले आहे. गोरख बच्छाव असे या तरुणाचे नाव आहे. गोरखचे जवळच्या गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या प्रेमाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले. मात्र यानंतरही गोरखने लग्नासाठी आग्रह धरला होता. पण त्या मुलीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसरीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला. यानंतर गोरखने मुलीचे लग्न तोडण्याचा प्रयत्न केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. याच रागातून शनिवारी ती तरुणी आणि तिचे आई-वडील, तसेच भाऊ यांनी देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात जाऊन गोरखला मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. तसेच या मारहाणीत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. याप्रकरणी देवळा पोलिसांनी संबंधित तरुणी, तिचे वडील आणि दोन भावांना अटक केली आहे.

Tags:    

Similar News