थकीत वीज बिल भरले नाही म्हणून महावितरणने वीज पुरवठा तोडल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्ये केली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या गावात ही घटना घडली आहे. शेतात राबराब राबून पिकवलेली पिकं पाणी असूनही वीजेअभावी सुकु लागली होती, सरकारनेही झालेल्या पिकवीमा व नुकसान भरपाई दिलेली नसताना वीजबील भरायचे कस, या विवंचनेतून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची सांगितले जात आहे.
कृष्णा राजाभाऊ गायके वय असे या 23 शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे कापसाचे पीक हातचे गेले होते. त्यानंतर कसे तरी करुन कृष्णा गायके यांनी आपल्या शेतात कांदा लागवडीसाठी बियाणे आणले होते, पण वीज खंडीत झाल्याने पाणी देता येत नव्हते. त्यात कांदा खराब होऊ लागला होता आणि शेतातील पिकेही सुकु लागले होते. याच नैराश्यातुन या तरुण शेतकऱ्याने आत्हात्या केल्याचे, या गावातील लोकांनी सांगितले. यंदा मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही नुकसान भरपाई न मिळाल्याची तक्रार केली आहे. त्यातच महावितरणने थकीच वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरू केल्याने शेतकरी प्रचंड तणावात आहेत.