विकी बेहेल, बाजीराव, अल्लाउद्दीन खिलजी अशी पात्र जिवंत करणारा अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या या न्यूड फोटोशूट नेटकऱ्यांना चर्चेसाठी हाती आयत कोलीत दिलं. त्याच्या फोटोशूटच काहींनी कौतुक केलंय तर काहींनी त्याच्यावर टीका केली. आता न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंह विरुद्ध चेंबुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केल्याचे तसेच महिलांच्या भावना दुखावल्याचे सांगत एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. "भारत हा संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला 'नायक' असे म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकाराला फॉलो करत असतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये, असं मत रणवीर विरुद्ध गुन्हा दाखल केलेल्या स्वयंसेवी संस्थेने व्यक्त केलं आहे.
स्वयंसेवी संस्थेने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी रणवीर सिंह विरोधात कलम ६७ अ, कलम २९२, २९३, ३५४ आणि ५०९ नुसार समाजाच्याभावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता रणवीरला अटक होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.