उघडा नागडा किरीट सोमय्या दाखवल्याप्रकरणी लोकशाहीच्या संपादकांवर गुन्हा दाखल
किरीट सोमय्या यांच्या उघड्या नागड्या व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना किरीट सोमय्या यांचे उघडे नागडे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तर लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार यांनी ही बातमी ब्रेक केली होती. त्यावर चर्चा घडवून आणली होती. अशा प्रकारे राजकीय नेत्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने प्रायव्हसी संपत असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी हा व्हिडीओ मॉर्फ नसल्याचे म्हटले असतानाही किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले होते. त्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर उत्तर प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यातच मानहानी केल्याचा दावा करत कलम 500 आणि माहिती अधिकार कायद्यातील कलम 66 (ई) आणि 67 (अ) अंतर्गत पूर्व सायबर पोलिस ठाण्यात कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी 6 सप्टेंबर रोजी जबाब दिला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा गुन्हा मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड केली नसल्याचे गुन्हे शाखेने म्हटले होते. मात्र त्यानंतर किरीट सोमय्या यांनी हा व्हिडीओ खरा नसल्याचा दावा केला होता. हा मुद्दा विधीमंडळात गाजल्याचे पहायला मिळाले होते.