रायगड हादरले..! 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार

रायगड जिल्ह्यातील पेण वाशी परिसरात 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणात पोलिसांकडून 7 ते 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित आरोपी फरार आहेत;

Update: 2022-01-30 03:50 GMT

रायगड जिल्ह्यातील पेण वाशी परिसरातील अल्पवयीन युवतीवर सामुहिक बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 7 ते 8 जणांना ताब्यात घेतले आहे. तर 10 पेक्षा जास्त आरोपी फरार असल्याची माहिती समोर येत आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण वाशी भागात धमकी देत 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्काराची अमानुष घटना घडली आहे. तर या प्रकरणातील आरोपी दररोज आळीपाळीने युवतीवर बलात्कार करत असल्याची घटना उघड झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तर सामुहिक बलात्कार प्रकरणात वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणात 7 ते 8 आरोपींना अटक केली आहे. मात्र अजूनही दहा ते बारा आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पेण तालुक्यातील वाशी परिसरात एका हळदीसमारंभात युवतीची दोन तरुणांसोबत ओळख झाली. त्यातून या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तर पुढे या तुरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारिरीक आत्याचार केले. त्यानंतर त्या तरुणांच्या मित्रांना माहिती मिळताच त्यांनीही तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर हे 17 वर्षीय युवतीवर दररोज आळीपाळीने बलात्कार करत होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर या प्रकरणात 15 पेक्षा अधिक जण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे तर उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे. याबाबतचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

Tags:    

Similar News