धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलिसांनी स्कार्पिओ गाडी मधून अवैधरित्या वाहून घेऊन जाणाऱ्या गाडीत ९० धारदार शास्त्र पकडली आहेत.याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून ८९ तलवारी एक खंजीर जप्त करण्यात आलं आहे.संबंधितांवर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे शहराजवळ असलेल्या मुंबई- आग्रा महामार्गावरुन एका स्कर्पिय़ो कारमधुन जवळपास ९० धारदार शस्त्र वाहून नेले जात असल्याचे आढळून आले आहे. सोनगीर पोलिसांना गस्तीच्या वेळी स्कार्पियो कार आढळल्यामुळे कार चालकाला कार थांबिविण्यासंदर्भात सांगण्यात आले मात्र कार चालकाने पोलिसांकडे लक्ष न देता गाडी आणखीन भरधाव वेगाने जोरात पळवली.पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत तिला अडवलं आणि गाडीची झडती घेतली.त्यामध्ये जवळपास ९० धारदार शस्त्र पोलिसांना आढळून आले आहेत.
या संदर्भात कारमध्ये असलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना याविषयी विचारला असता, हे शस्त्र चित्तोडगड येथून जालना कडे नेले जात असल्याची माहिती समोर आली आहे.आता ही शस्त्र कुठल्या मोठ्या घातपाताच्या उद्देशाने नेली जात होती का यादृष्टीने धुळे पोलीस या संदर्भातील पुढील तपास करीत आहेत.