कोरोना आजारावर परिणाम करणारे रेमडेसीवीर इंजेक्शन सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मिळत नसताना लोक आक्रोश व्यक्त करत आहेत. त्यातच काळ्याबाजारात 25 ते 30 हजार रुपयाला इंजेक्श्न विकणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे.
काळा बाजार करणारे डॉक्टर आणि मेडिकल चालक
या रॅकेट मध्ये मेडिकल क्षेत्रातच लोक काळा बाजार करत असल्याचं समोर आलं आहे. जळगाव मधील दोन तर भुसावळ येथील एक डॉक्टर तसेच मेडिकल चालक, लॅब असिस्टंट अशा एकूण 14 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर डॉक्टर फरार झाले आहे.
रेमडेसीवर ची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पहिल्या पथकानं सापळा रचला. त्यात मोठं रॅकेट उघड झाले. सुरुवातीला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शेख समीर शेख सगीर याला ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून नवल कुंभार, सुनील अहिरे, डॉ आले मोहमद खान, अजीम शहा, दिलावर शहा, जुनेद शहा, झाकीर शहा, झुल्फिकार अली, निसार अली सय्यद, मुसेफ शेख कयूम यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी इतर साथीदारांना अटक केल्याची माहिती मिळताच हॉस्पिटल मधील डॉक्टर फरार झालेत. पोलिसांनी या टोळी कडून पाच रेमडेसीवीर इंजेक्शन मोबाईल असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.
पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने
नावकार मेडिकलचे आकाश जैन, शुभम चव्हाण, मयूर विसावे या तिघांना रेमडेसीवीर इंजेक्शन 22 ते 33 हजार रुपयाला विकताना अटक केली. त्यांच्या कडून दोन इंजेक्शन सह मोबाईल एक लाख 37 हजार रुपयांचा माल जप्त केलाय.
रेमडेसीवीर काळ्या बाजारात 25 ते 30 हजार रुपयात
राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शन चा प्रचंड तुटवडा आहे. कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना ठिकठिकाणी इंजेक्शन मिळवण्यासाठी दिवसरात्र करावी लागत आहे. तर काही ठिकाणी आंदोलन करावी लागली. ह्याच रेमडेसीवीरसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकारण शिगेला पोहचले आहे. मात्र, हेच रेडेडीसीवर इंजेक्शन सरकारी किंमती नुसार 1200 रुपयांऐवजी काळ्या बाजारात 25,000 ते 30,000 रुपयांना सर्रास चढ्या भावाने रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी नाईलाजास्तव लोकांना घ्यावी लागत आहे.
मेडिकल माफिया जळगाव प्रमुख केंद्र -
कोरोना आजारासाठी प्रचंड मागणी असलेले रेमडेसीवीरचा तुटवडा झाल्यानंतर रेमडेसीवीरच्या काळ्या बाजाराचे जळगाव हे प्रमुख केंद्र बनलं असल्याची जोरदार चर्चा आहे. पोलिसांनी जी कारवाही केली ही फक्त सुरवात असून छोटे मासे आहेत. मात्र, पोलीसांनी कोणाच्याही दबावात न येता योग्य तपास केला तर खऱ्या मेडिकल माफियांपर्यंत पोहोचता येईल. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
काळा बाजार करणाऱ्यांची पोलिसांना माहिती द्या - पोलीस अधीक्षक
कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना नाईलाजास्तव काळ्या बाजारात रेमडेसीवीर घ्यावेच लागते , मात्र काम झाल्यावर तरी पोलिसांना अश्या प्रवृत्तीची माहिती पोलिसांना द्या, यासाठी 7219091773 ह्या व्हाट्सएप नंबर वर माहिती द्या अस आवाहन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी केले आहे.