राज्यात 24 तासात 61 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त, 802 मृत्यू

Update: 2021-05-01 18:06 GMT

राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवला आहे. पण तरीही राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 60 हजारांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 63 हजार 282 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 802 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे राज्यात 24 तातास 61 हजार 232 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 39,3 हजार 302 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.२४% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृतयूदर १.४९% एवढा आहे. सध्या राज्यात ४० लाख ४३ हजार ८९९ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर २६ हजार ४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. 1 मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पण लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण वेगाने होऊ शकत नाहीये.

Tags:    

Similar News