आज नाशिक येथे ऑक्सिजन लीक झाल्यानं 22 लोकांचा मृत्यू झाला. त्याचीच पुनरावृत्ती अंबाजोगाई येथे झाली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अंबाजोगाईमध्ये स्वरातील रुग्णालयांमध्ये, अर्धा तासासाठी ऑक्सिजन बंद झाला होता. ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी. अशी मागणी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.
विशेष म्हणजे या घटनेची चौकशी करून नाशिकच्या घटनेमध्ये मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत सरकारने दिली आहे. तशीच मदत अंबाजोगाई च्या घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना द्यावी. अशी मागणी भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे...