Mumbai कोविड (Covid)बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pendanekar) यांची ईडीने (ED)सहा तास कसून चौकशी केली. पेडणेकरांना याआधी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते; परंतु पेडणेकर या चौकशीला सामोरे गेल्या नव्हत्या. त्यानंतर त्या गुरुवारी चौकशीला हजर राहिल्या. त्यांच्यावर कोरोना काळात डेडबॉडी बॅगच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सहा तासांच्या चौकशीनंतर पेडणेकर ईडी कार्यालयाबाहेर आल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
दरम्यान यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की "'मी ईडीचे समन्स आल्यानंतर पहिल्या तारखेला येऊ शकले नाही. मी आज आली. त्यांनी जे प्रश्न विचारले त्याची खरी उत्तरे देणे माझे काम आहे. मी मुंबई, महाराष्ट्र आणि देशाची नागरिक आहे. ते मी केले आहे. त्यांना हव्या असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. मी त्यांना संपूर्ण सहकार्य केलं असल्याचं पेडणेकरांनी सांगितले आहे.
नेमक प्रकरण काय ?
कोविडमुळे मृत्यू झालेल्यांना नेण्यासाठी महापालिकेने (BMC) बॉडी बॅग्सची खरेदी केली होती; मात्र त्यात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी किशोरी पेडणेकर व महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटकेची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, पेडणेकर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली. ४ सप्टेंबरला न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले, तसेच ११ सप्टेंबर, १३ सप्टेंबर व १६ सप्टेंबर रोजी त्यांना पोलिसांतर्फे होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, पेडणेकर चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या; परंतु याच प्रकरणी आता ईडीने पेडणेकरांना समन्स बजावले आहेत.