बीड जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी सकाळी 7.30 ते संध्या 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी संवेदनशील बूथवर तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये 1600 अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 158 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 531 उमेदवार, तर 3 हजार 236 सदस्य रिंगणामध्ये आहेत.या साठी 2 लाख 86 हजार 409 मतदार असून 561 मतदान केंद्रे आहेत.186 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात बिनविरोध 11 तर 16 ग्रामपंचायत मध्ये मतदानावर बहिष्कार आहे. दरम्यान, जिल्ह्यात 2 लाख 86 हजार 409 मतदार असून, त्यात स्त्री मतदार संख्या 1 लाख 33 हजार 853, तर पुरुष मतदार संख्या 1 लाख 53 हजार 744 एवढी आहे. तर 561 मतदान केंद्रे आहेत.