नाशिकमध्ये आज वेगवेगळ्या अपघातात 5 जणांचा मृत्यू

Update: 2021-10-13 11:59 GMT

नाशिकमध्ये आज वेगवेगळ्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवार हा नाशिकसाठी अपघात वार ठरला. एका कारने उभ्या असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका औषध कंपनीचे दोन मॅनेजर, एक मार्केटिंग प्रतिनिधीचा जागीच मृत्यू झाला.

शरद गोविंदराव महाजन (वय 39, रा. म्हसरूळ, नाशिक), भूषण बाळकृष्ण बधान (वय 36, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) आणि राजेश तिवारी (वय 34, रा. कल्याण, ठाणे) हे तिघे पुण्यातून बैठक आटोपून नाशिककडे निघाले होते. बुधवारी पहाटे त्यांची कार नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे परिसरात आली. येथे हॉटेल अन्वितासमोर एक आयशर ट्रक (टी. एस. 30 टी. 8886) उभा होता. मात्र, स्विफ्ट कारच्या चालकाने (एम. एच. 15 सी. टी. 1721) पाठीमागून आयशरला धडक दिल्याने जोरदार अपघात झाला. त्यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही मृतदेहांचे दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

तर दुसरी घटना नाशिकच्या द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावर घडली. यात एका ट्रकने धडक दिल्याने 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत तरुणाचे नाव अविनाश राजेंद्र सूर्यवंशी असं असून तो जळगाव जिल्ह्यातल्या गलवाडा येथील होता. सध्या तो सिडकोतल्या दत्त चौकात राहत होता. अविनाश हा द्वारका सर्कलकडून दुचाकीवर (एम. एच. 15 डीजी 2239) उड्डाणपुलावरून सिडकोकडे जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने (एम.पी. 09 एच.एच.8267) त्याच्या दुचाकीला उडवले. त्याला रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर नाशिकमध्ये दुचाकीवरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश कारभारी शिंदे (वय 30) असे मृताचे नाव आहे. ही घटना औद्योगिक वसाहतीत घडली. महेश शिंदे हे एमआडीसीतून श्रमिकनगरकडे निघाले होता. मात्र, अचानक धावत्या दुचाकीवरून ते रस्त्यावर पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मुंबईनाका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.ve

Tags:    

Similar News