वर्धा जिल्ह्यात रस्ताच्या कामात येणारी 57 ते 58 वृक्ष तोडण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रितसर परवानगी घेऊन झाडं तोडल्याचा दावा केला आहे. पण आता यावरुन वाद सुरू झाला आहे. अपघाताला कारणीभूत ठरणारी ५७ ते ५८ झाडे तोडण्याचा निर्णय विभागाचे अधिकारी आणि वृक्ष बचाव समितीच्या सदस्यांनी केलेल्या संयुक्त सरर्वेक्षणात घेण्यात आला होता, असे सांगितले जात आहे. २९ जुलैपासून वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली असून जवळपास ४५ झाडे तोडण्यात आली आहे. पण आता या वृक्षतोडीला आक्षेप घेतला गेला आहे.