लसींचा तुटवडा, मुंबईत आज ४० खासगी केंद्र बंद

Update: 2021-04-29 02:24 GMT

कोरोनाचे चक्रव्यूह भेदण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी पर्याय आहे. त्यासाठी सरकारने लसीकरणाच्या मोहीमेची व्याप्ती आता वाढवली आहे. एक मेपासून आता 18 वर्षांवरील सगळ्यांना लस दिली जाणार आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा उपलब्ध होऊ शकतो का अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. कारण पंचेचाळीस वर्षांवरील सगळ्यांना सध्या लस देण्याची मोहीम सुरू आहे. पण मुंबईत पुन्हा एकदा लस पुरवठ्या अभावी लसीकरणात व्यत्यय येत आहे.

गुरुवारी देखील लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील ४० खासगी लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येतील अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तर ३३ खासगी केंद्रांवरही मोजके डोस शिल्लक असल्याने दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण होणार आहे. त्याचबरोबर लसींचा साठा रात्री उशिरा मिळणार असल्याने सरकारी आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर १२ वाजेननंतर लसीकरण सुरू होईल असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

Tags:    

Similar News