शिराळ्यातील ३८९ लोकांना सुरक्षित हलवलं : तहसीलदार गणेश शिंदे

Update: 2022-07-15 14:10 GMT

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस जोराचा सुरू आहे. चांदोली परसरातील डोंगरदऱ्यामध्ये छोट्या-मोठ्या वाड्यावस्त्या वसल्या आहेत. त्या वाड्यांपैकी चार गावांना भूस्खलनाचा मोठ्या प्रमाणात धोका उत्पन्न होऊ शकतो. याची पूर्व उपाय योजना म्हणून कोकणेवाडी दामनवाडी, भाष्टेवाडी,मिरूखेवाडी,डफळेवाडी आदी गावातील 389 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आणि त्यांची प्रशासन पूर्णपणे काळजीपूर्वक उपायोजना करत असल्याची माहिती शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा पावसाचा आगार समजला जाणाऱ्या पैकी आहे. त्यामध्ये शिराळा पश्चिम भागामध्ये वारणा धरण परिसरामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे वसंत सागर जलाशय साधारणतः 51% भरला आहे.

धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी आहे सध्या धरणामध्ये 17.61 पाणीसाठा आहे. आज रोजी धरणामध्ये 51.16 टक्के पाणीसाठा झाला आहे तसेच वारणा डावा कालव्याच्या दरवाज्यातून ७६५क्युक्सेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वारणा धरणातून सोडलेल्या पाण्यावरती खाजगी कंपनीच्या दोन जनित्रामधून एकूण ४ मेघावट वीज निर्मितीला सुरुवात झाली आहे. चांदोली परिसरामध्ये जोरदार पाऊस व सोसाट्याचा वारा असल्यामुळे गेल्या 24 तासांमध्ये ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या वर्षाखेरीज एकूण पाऊस 720 किलोमीटर पडल्याची नोंद आहे.

Full View

Tags:    

Similar News