गडचिरोली पोलिसदलाकडून 26 नक्षल्यांचा खात्मा
गडचिरोली पोलिसदलाकडून 26 नक्षल्यांचा खात्मा;
धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती कोटगुल जंगल परिसरात आज सकाळी झालेल्या पोलीस आणि नक्षल चकमकीत 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश मिळाले आहे. या परिसरात नक्षल्यांच्या हालचाली असलेल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात नक्षल विरोधी अभियान तीव्र केले होते. या दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस दलावर गोळीबार केला.
त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पोलिसांनी गोळीबार केला. या चकमकीत 26 नक्षल्यांच्या खात्मा करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले आहे. गडचिरोली पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून यामध्ये काही जखमी जवानांना हेलिकॉप्टर ने उपचाराकरिता नेण्यात आले आहे.
या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असून मृत नक्षल्यांच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात नक्षल्यांच्या खात्मा करण्याची गेल्या तीन वर्षातील ही दुसरी घटना असून यामुळे नक्षल चळवळीला हा मोठा हादरा मानला जात आहे.