चेंबुर आणि विक्रोळीतील मृतांच्या नातेवाईकांना PMOची 2 लाखांची मदत, मृतांची संख्या 23

Update: 2021-07-18 06:59 GMT

मुंबईत शनिवारपासून सुरू असलेल्या पावसात चेंबुर आणि विक्रोळ इथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 23 झाली आहे. या दुर्घटनेची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर कऱण्यात आली आहे. तसेच जखमी झालेल्या 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर NDRFने तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यामूळे ढिगाऱ्याखआलून काही जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

चेंबुरमधील भारतनगरमध्ये सुरक्षा भिंत काही झोपड्यांवर कोसळली आहे. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखीही काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त होते आहे. डोंगराला लागून एक भिंत बांधण्यात आली होती. तसेच त्या भिंतीला लागून काही झोपड्या होत्या. पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली आणि भिंत झोपड्यांवर कोसळून ही दुर्घटना घडली आहे.


तर दुसरीकडे विक्रोळीमध्ये सुर्यनगर येथे पहाटे 3 वाजताच्या दरम्यान मुसळधार पावसाने 7 ते 8 घरे कोसळली आहेत. यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रामनाथ तिवारी(४५), अनिकेत रामनाथ तिवारी(23), कविता रामनाथ तिवारी(४२) अशी त्यांची नावे आहेत. तर नितु तिवारी(२३) या जखमी आहेत. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहेत.

Tags:    

Similar News