पुन्हा नोटबंदी !

रिजर्व बँक ऑफ इंडिया ने दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून परत घेण्याची घोषणा केलीय.;

Update: 2023-05-19 14:26 GMT

रिजर्व बँकेने सर्व बँकांना सूचना केलीय की तात्काळ २ हजार रूपयांच्या नोटा ग्राहकांना देणं बंद करा. २ हजार रूपयांच्या सर्व नोटा या वैध चलन म्हणून अस्तित्वात राहतील. क्लीन नोट धोरणाअंतर्गत रिजर्व बँकेनं हा निर्णय घेतलाय. येत्या ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रूपयांच्या नोटा अधिकृत म्हणून ग्राह्य धरल्या जातील.

२०१६ मध्ये रिजर्व बँकेनं २ हजारांच्या नोटा चलनात आणल्या होत्या

नोव्हेंबर २०१६ मध्ये रिजर्व बँकेनं आरबीआय च्या कलम १९३४ च्या पोटकलम २४(१) नुसार २ हजार रूपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. रिजर्व बँकेनं नोटबंदी नंतर २ हजार रूपयांच्या नव्य नोटा चलनात आणल्या होत्या. कारण त्यावेळी ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. कारण ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटांचा बाजार आणि अर्थव्यवस्थेवरील प्रभाव कमी करण्यासाठी रिजर्व बँकेनं हा निर्णय घेतला होता. जेव्हा इतर मुल्यांच्या नोटा अपेक्षित प्रमाणात उपलब्ध झाल्या त्यानंतर २ हजार रूपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश यशस्वी झाल्याचं रिजर्व बँकेनं स्पष्ट केलं.

२३ मे पासून सुरू होणार बँकांमध्ये नोटा बदलण्याची प्रक्रिया

ग्राहकांना २ हजार रूपयांच्या नोटा बँक खात्यांमध्ये जमा करण्याची मुभा असेल किंवा इतर मुल्यांच्या कुठल्याही नोटांसोबत कुठल्याही बँकेत जाऊन ते नोट एक्सचेंज करू शकतील. मात्र, एकावेळी जास्तीत जास्त २० हजार रूपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. ही प्रक्रिया २३ मे पासून सुरू होणार आहे आणि ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपेल.

Tags:    

Similar News