कुर्ला नेहरुनगर येथे पार्किंग लावलेल्या 20 ते 25 दुचाकींना भीषण आग ; आगीत सर्व दुचाकी जळून खाक

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-10-13 04:36 GMT
कुर्ला नेहरुनगर येथे पार्किंग लावलेल्या 20 ते 25 दुचाकींना भीषण आग ; आगीत सर्व दुचाकी जळून खाक
  • whatsapp icon

मुंबई : मुंबईतील कुर्ला नेहरुनगर धम्म सोसायटीमध्ये पार्किंग लावलेल्या 20 ते 25 दुचाकींना अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीत सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 16 फायर इंजिन 18 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला आहे. ही आग नेमकी कशी लागली, कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

तर तिकडे मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर एका आयशर टेम्पोने अचानक पेट घेतला. या घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक्सप्रेस-वेवर मुबंईहुन पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो काही कारणांमुळे बंद पडला होता. त्या टेम्पोला पेट्रोलिगं टिमने एका बाजुला करुन बँरिगेट्स लावले. त्यानतंर काही वेळातच या टेम्पोने अचानक पेट घेतला. त्या आगीमध्ये टेम्पोच्या केबीन मधील एक व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेहाला टेम्पोतून काढून खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

Tags:    

Similar News