Omicron व्हेरिएंटची देशात एकूण 40 रुग्ण; एकट्या महाराष्ट्रात 20 रुग्ण

Update: 2021-12-14 01:54 GMT

मुंबई// महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये चढ-उतार होत आहेत. त्यातच सोमवारी कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी एक लातूरचा तर एक पुण्याचा रुग्णआहे. अशावेळी राज्यात ओमिक्रॉनचे एकूण संख्या 20 झालेत. देशात ओमिक्रॉनचे 38 रुग्णसंख्या होती, आता दोन नवीन रुग्णांसह ही संख्या 40 झाली आहे.

त्याचवेळी राज्यात 24 तासांत कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळून आलेत, तर 498 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. यासह 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता राज्यात कोरोनाचे 6,507 सक्रिय रुग्ण आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. रविवारी नागपुरात एक तर मुंबईत तीन रुग्ण सापडले होते.

Omicron व्हेरिएंटची एकूण 40 प्रकरणे देशभरात आहेत आणि 20 प्रकरणे एकट्या महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे देशातील ओमिक्रॉन प्रकारातील निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातच आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्र आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचा बालेकिल्ला बनेल की काय?, अशी भीती व्यक्त होत आहे. याआधी दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणाऱ्या डेल्टा प्रकारातील सुमारे निम्मी प्रकरणे अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातून येत होती. एवढेच नाही तर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे.

Tags:    

Similar News