दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला परवडणारे नाही, विधानसभा अध्यक्षांनी फटकारले
सरकारने हिवाळी अधिवेशन दोन दिवसांचेच ठेवल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नियमावली तयार करण्यासंदर्भात भूमिका मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला परवडणारे नाही, असे सुनावले.
जनतेचे प्रश्न सोडवणे या दोन दिवसात शक्य नाही. इतर राज्यांमध्ये अधिवेशन आठ ते १० दिवसांचे घेण्यात आले आहे. त्यामुळे या पुढचे अधिवेशन नियमित होईल असे नियोजन सरकारने करावे अशी सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी केली आहे.