देशातील 180 जिल्हे कोरोनामुक्त, कोरोनाच्या लढाईत मोठं यश

देशातील टॉप 20 एक्टिव केसेस असणारे जिल्हे कोणते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत सर्वांधिक रुग्ण? वाचा देशातील कोरोनाची स्थिती एका क्लिकवर

Update: 2021-05-08 11:34 GMT

देशातील कोरोनाच्या सद्यस्थिती संदर्भात आज 25 वी ग्रुप ऑफ मिनिस्टर्स ची बैठक पार पडली. या बैठकीचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे अध्यक्ष होते. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी लोकांना कोरोनाचा दुसरा डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीची देखील माहिती दिली.

या बैठकीत चर्चेत आलेले महत्त्वाचे मुद्दे


कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढला

गेल्या 24 तासात देशात 3 लाख लोक कोरोना मुक्त झाले आहेत.

180 जिल्हात देशात गेल्या 7 दिवसात कोणतीही नवीन केस नाही.

18 जिल्ह्यात 14 दिनांपासून एकही केस नाही. तर 54 जिल्ह्यात 21 दिवसांपासून आणि 32 जिल्ह्यात 28 दिवसांपासून एकही केस नाही.

देशात सध्या 4,88,861 रुग्ण ICU मध्ये आहेत. तक 1,70,841 रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत. 9,02,291 रुग्ण ऑक्सिजन सपोर्ट वर आहेत.

लसीकरण...

देशात 16.73 लोकांचं लसीकरण झालं आहे. तर 53,25000 डोस पाइपलाइनमध्ये असून ते राज्यांना दिले जात आहेत. वाढणाऱ्या केसची संख्या पाहता शहरांमध्ये टेस्टींग तसंच कोव्हिडच्या विरोधात लढाईसाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असल्याचं डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

देशातील टॉप 20 एक्टिव केस असणारे जिल्हे?

बेंगलुरु,अर्बन,गंजाम,पूणे,दिल्ली,नागपुर,मुंबई,एर्नाकुलम,लखनऊ,कोझिकोड,ठाणे,नाशिक,मल्लापुरम,त्रिसूर,जयपुर,गरुग्राम,चेन्नई,तिरुवनंतपुरम,चंद्रपुर,कोलकाता' पलककण.

या जिल्ह्यात सर्वांधीक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Tags:    

Similar News