मुंबई - इंग्लंडमध्ये नवा करोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यापैकी ११२२ प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली.
यापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत.
त्यात नागपूर – ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी -३, पुणे -२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १ अशी संख्या आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या संपर्कातील ७२ पैकी दोघांना कोरोना झालेला आहे.