#Shivjayanti : बीडमध्ये शिवाजी महाराजांचे 15 हजार स्केअर फुट पोर्ट्रेट, दिली अनोखी मानवंदना
शिवजयंतीनिमीत्त जगभरातून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते. मात्र बीडमध्ये शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंतीनिमीत्त जगभरातून मानवंदना दिली जाते. मात्र बीड जिल्ह्यातील गेवराई येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना 15 हजार स्केअर फुट पोर्ट्रेटमधून अनोखी मानवंदना दिली आहे.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जगभरातून मानवंदना दिली जाते. त्यांच्या इतिहासाचे स्मरण करुन त्यातून प्रेरणा घेतली जाते. तर राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यातच बीड जिल्ह्यातील गेवराई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त अनोखी मानवंदना देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे 15 हजार फुट स्केअर फुट पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे. तर ते पोर्ट्रेट बनवताना गड किल्ल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टोनचा वापर करण्यात आला आहे. तर या पोर्ट्रेटच्या निर्मीतीसाठी एक आठवड्यांचा कालावधी लागला आहे. तसेच दीडशे बाय शंभर फुट जागेत 17 ब्रास बेसॉल्ट स्टोन, 250 किलो चुना आणि 160 किलो काळा रंग वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे. त्यामुळे या अनोख्या मानवंदनेची राज्यभर चर्चा आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा महामारीमुळे शिवजयंतीचा उत्सव बंद होता. कोरोना निर्बंधांमुळे शिवजंयती आपल्या घरी साजरी करण्याचे निर्देश होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शिवजंयती साजरी केली जात नव्हती. मात्र अखेर दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे यंदा शिवजयंतीनिमीत्त शिवप्रेमींकडून अनोखी मानवंदना देण्यात येत आहे.