Lockdown काळात मोदींच्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांकडून कोट्यवधींची मालमत्ता खरेदी

Update: 2021-10-19 08:09 GMT

कोरोनाचे (covid-19) संकट येऊन आता जवळपास पावणे दोन वर्ष झाली आहेत. या काळात अर्थव्यवस्था (econony)खालावली, अनेकांचे रोजगार गेले. तर याच काळाच वाढत्या महागाईने (inflation) सामान्यांचे कंबरडे पुरते मोडून टाकले आहे. एवढी सगळी भयावह परिस्थिती असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi)यांच्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांनी (ministers) गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि फ्लॅट खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले उत्तर दिले आहे.

पंतप्रधान कार्यालयच्या (pmo)वेबसाईटवर सर्व मंत्र्यांची मालमत्ता जाहीर कऱण्यात आली आहे. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनच्या काळात केंद्रीय मंत्री किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देशभरात विविध ठिकाणी शेती आणि बिगरशेती जमीन खरेदी केल्याची माहिती यामधून समोर आली आहे.

७८ मंत्री असलेल्या मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आपली मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी २०२०-२१ या वर्षात विकत घेतलेल्या मालमत्तांची माहितीही जाहीर केली आहे. यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर,(S.Jaishankar) महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani )आणि आयुष मंत्री सरबनंदा सोनोवाल यातीन कॅबिनेट (cabinet) मंत्र्यांसह ९ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर एप्रिल २०२० पासून १२ मंत्र्यांनी २१ मालमत्ता खरेदी केल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सात मालमत्ता या शेतजमीन आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी इतर ५ राज्यमंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या लोकसभा मतदरासंघात मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या १२ मंत्र्यां व्यतिरिक्त कॅबिनेट मंत्री गिरीराद सिंग आणि त्यांच्या पत्नीने आपली मालमत्ता विकली आहे, पण त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात दिलेल्या माहितीमध्ये मालमत्तेची जेवढी किंमत होती त्यापेक्षा अनेक पटींनी ही करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी दक्षिण दिल्लीत वसंत विहारमध्ये ३ हजार ८५ स्केअर फुटांचा फ्लॅट ३ कोटी ८७ लाखांना घेतला आहे. ८ ऑगस्ट २०२० रोजी ही खरेदी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच ही मालमत्ता त्यांच्या स्वत:च्या नावावर आणि पत्नीच्या नावावर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात ०.१३४० हेक्टर जमीन खरेदी केली आहे. या मेदन मवाई या गावात १२ लाख रुपयांना ही जमीन १९ फेब्रुवारी २०२१ रोदी खरेदी करण्यात आली आहे. तर सरबनंदा सोनोवाल यांनी आसाममधील दिब्रुगढमध्ये फेब्रुवारी महिन्यात ३ मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तर २०२०-२१ या वर्षात ४५ राज्यमंत्र्यांपैकी ९ राज्यमंत्र्यांनी मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपात नाईक यांनी उत्तर गोवा या त्यांच्या मतदारसंघात बिगरशेती जमीन आणि प्लॉट खरेदी केले आहेत. यामध्ये ७ लाख आणि १ लाख ८ हजार रुपयांचे दोन प्लॉट आहेत. २७ नोव्हेंबर २०२० रोजी ही खरेदी झाली. ८ डिसेंबर २०२० रोदजी ४० लाख ९५ हजार रुपयांना रहिवासी बिल्डिंग खरेदी कऱण्यात आली.

कृष्णनपाल गुर्जर यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या हरयाणात ३ शेतजमिनी संयुक्त भागीदारीमध्ये खरेदी केल्या आहेत. १० ऑक्टोबर २०२० रोजी फरीदाबादमध्ये, १ कोटी ४७ लाख रुपयांची जमीन खरेदी करण्यात आली आहे ३१ ऑक्टोबर २०२०मध्ये भुपानीमध्ये करण्यात आली. तर खेरीमध्ये २४ फेब्रुवारी २०२१ रोजी ४ कोटी २१ लाखांना जमीन खरेदी करण्यात आली.

ज्या ९ मंत्र्यांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे, त्यापैकी ६ नेत्यांचा समावेश हा जुलैमध्ये झाल्येल्या मंत्रिमंडळ विस्तारात करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News