Bihar Accident : बिहारमध्ये गर्दीत ट्रक घुसला, 12 लोकांना चिरडले, दुर्घटनेची पंतप्रधान मोदी यांच्याकडून दखल

Bihar Accident : बिहारमधील वैशालीनगर जिल्ह्यात भरधाव वेगाने ट्रक मिरवणूकीत घुसल्याने 12 लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची पंतप्रधान मोदी यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे.

Update: 2022-11-21 03:17 GMT

बिहारमधील वैशालीनगर जिल्ह्यात ट्रक गर्दीत घुसल्याने 12 लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल घेण्यात आली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

वैशालीनगरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याबरोबरच अपघातात जखमी झालेल्यांना पंतप्रधान मोदी यांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची तर जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही ट्वीट करून मृतांना आदरांजली वाहिली आहे.

पुण्यातही घडली आहे अशीच घटना

मुंबई-बंगळूर बायपासवर रविवारी रात्री टँकर चालकाचं नियंत्रण सुटले. त्यानंतर टँकरच्या धडकेने 48 वाहनांचे नुकसान झाले असून सात ते आठ जणांवर उपचार सुरु आहेत.

Tags:    

Similar News