मोठी बातमी :राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
राज्यात दुसऱ्या लाटेच्या वाढता कोरोना च्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता इयत्ता दहावीची म्हणजे एसएससी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज केली.
राज्याने यापूर्वीच दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित केला होता. केंद्रीय बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द करून बारावीचा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्य सरकारने या निर्णयाची पुनरावृत्ती करत दहावीच्या परीक्षा तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षण करून निकाल घोषित केला जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थांना जास्त मार्क्स हवेत त्या विद्यार्थ्यांबाबत विद्यार्थ्यांचा वेगळ्या पध्दतीने परीक्षण करण्यासंदर्भात ऑनलाईन कशी कृती करावी, या संदर्भातही भविष्यात निर्णय घेतला जाईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.