खडसे समर्थक भाजप नगरसेवक राष्ट्रवादीऐवजी शिवसेनेच्या गळाला: राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंना मोठा धक्का

Update: 2021-05-26 16:37 GMT

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा गड असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायत मधील खडसे समर्थक भाजपचे सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. विशेष म्हणजे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंबरोबर जळगाव जिल्ह्यातील अनेक खडसे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं वाटत असतानाच खडसेंचा गड मनाला जाणारा स्वतःच्या मतदार संघातील व सत्तेत असलेल्या मुक्ताईनगर नगरपरिषदेतील सहा नगरसेवक राष्ट्रवादीत न जाता शिवसेनेत दाखल झाले. विशेष म्हणजे मुक्ताईनगर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सहा नगरसेवकांना वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधलं.

खडसेंवरच होते नाराज नगरसेवक

मुक्ताईनगर नगरपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून भाजप च्या नगरसेवकांना प्रचंड दबावात ठेवून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून येणाऱ्या विकास कामांना अडचणी निर्माण करवून ठराव न घेऊ देणे. हा प्रकार गेल्या दोन दिवसापूर्वीच पाहायला मिळाला होता. यामुळे ह्या नगरसेवकांचा खडसेंना सोडचिठ्ठी देत आज सहा नगरसेवकांनी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला तर उर्वरित चौंघाचा प्रवेश उद्या होणार असल्याचे बोललं जातं आहे. यामुळे एकूण 10 नगरसेवक शिवसेनेच्या गोटात गेले आहे

कोण आहेत नगरेसवक -

1) पियुष मोरे - भाजप चे गटनेते

2)संतोष कोळी -

3) मुकेशचंद्र वानखेडे

4)बिलकीसबी अमानउल्ला खान

5)शबाना बी अब्दुल आरिफ

6) नुसरत बी मेहबूब खान

खडसेंच राष्ट्रवादीत महत्व कमी होईल ?

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसेंनी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला , खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर या उत्तर महाराष्ट्रातील अनेक खडसे समर्थक नेते, कार्यकर्ते भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं बोलल जात होतं, मात्र सद्या कोणतीही निवडणूक नसल्याने शहादा येथील भाजप चे माजी आमदार यांच्या शिवाय दुसऱ्या कोणत्याही मोठ्या नेत्याने खडसेंबरोबर जाणं पसंत केलं नाही.खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर मधीलच खडसे समर्थक नगरसेवकच राज्यातील सरकार मध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश न करता शिवसेनेत केल्याने भाजप पेक्षा खडसेंनाच मोठा धक्का मनाला जात आहे. विशेष म्हणजे मुक्ताईनगर पालिकेत एकही नगरसेवक राष्ट्रवादीचा काँग्रेसचा नाही, यामुळे खडसेंच राष्ट्रवादीत महत्त्व कमी होईल का ? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू शकते.

मुक्ताईनगर मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिघाडी -

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा आघाडी आहे. मात्र मुक्ताईनगर मध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच प्रचंड राजकीय वैर आहे.यामुळे पाटील आणि खडसे यांचे समर्थक एकमेकांना कायम भिडत असतात. विशेष म्हणजे सरकारच्या विविध कामांच्या बाबतीतही कायम शाब्दिक वाद पाहायला मिळत, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे खडसे समर्थक एकमेकांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाही.

स्थानिक राजकारणात पकड असली तरच राज्याच्या राजकारणात पकड हे आता समीकरण झालं आहे.स्वतःची पकड मजबूत करण्यासाठी रस्सीखेच चालू आहे मात्र राज्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या मुक्ताईनगर मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये बिघाडी आहे.

अपात्रतेच्या भीतीपोटीच नगरसेवकांचे पक्षांतर: एकनाथ खडसे ‌

मुक्ताईनगर नगरपंचायत भाजपाच्या तेरा आणि 1 अपक्ष अशी 14 संख्या आहे यापैकी शिवसेनेत आज दहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी आहे परंतु आज केवळ भाजपाचे चार व एक अपक्ष असे पाच नगरसेवकच शिवसेनेकडे गेल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी भाजपाची एक नगरसेविका ही चार अपत्ये असल्याच्या कारणाने अपात्र झालेली आहेत. तर उर्वरित त्या तीन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार असल्याच्या भीतीपोटी तसेच त्यांच्या वरील अपात्रतेची कारवाई होऊ देणार नाही अशी खात्री संबंधितांनी दिली असल्यामुळेच त्या नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ही बातमी दिशाभूल करणारी असल्याचेही राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी आज मुक्ताईनगर येथे फार्म हाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

मुक्ताईनगर नगरपरिषद एकूण सदस्य- 17

भाजप-13

शिवसेना - 03

अपक्ष -01

राष्ट्रवादी -00

काँग्रेस -00

Tags:    

Similar News