सध्या सुप्रिया सुळे या तीन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आजच्या त्यांच्या भेटीचे ठिकाण होते, बहिणाबाई चौधरी असोदा गाव. त्यावेळी त्यांनी बहिणाबाई चौधरी स्मारकाला देखील भेट दिली. हे स्मारक साडे चार वर्षांपासून बनवण्याचे रखडले आहे. या स्मारकाला निधी मिळत नसून या स्मारकाच्या उंचीवरही सरकारने आक्षेप घेतला होता.
आघाडी सरकारनुसार १८ मीटर उंचीचे स्मारक उभारण्यात येणार होते, परंतू फडणवीस सरकारने १० मीटरने स्मारकाची उंची कमी केली, याबाबत तक्रार करुनही काही उपयोग झाला नाही तसेच अडीच वर्षात स्मारकाचे कामही रखडले आहे.
त्याबाबत सुप्रिया सुळेंनी याची विचारणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करेन असा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे तर लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करा अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.